"आमच्या पक्षाचे चिन्ह वापरणे हे गुन्हेगारी कृत्य..." घड्याळ चिन्हाच्या वापरावरून रविंद्र धंगेकरांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:42 IST2024-05-10T10:38:47+5:302024-05-10T10:42:02+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे....

"Using our party symbol is a criminal act..." Complaint against Ravindra Dhangekar over use of clock symbol | "आमच्या पक्षाचे चिन्ह वापरणे हे गुन्हेगारी कृत्य..." घड्याळ चिन्हाच्या वापरावरून रविंद्र धंगेकरांविरोधात तक्रार

"आमच्या पक्षाचे चिन्ह वापरणे हे गुन्हेगारी कृत्य..." घड्याळ चिन्हाच्या वापरावरून रविंद्र धंगेकरांविरोधात तक्रार

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या प्रचारसाहित्यात राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ जाणीवपूर्वक वापरले आहे. त्यांची ही कृती केवळ निवडणूक कायद्यांचे उल्लंघन करत नाही, तर मतदारांची दिशाभूल करणारी आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी कायद्यानुसार काँग्रेस उमेदवाराने प्रचारात आमच्या पक्षाचे चिन्ह वापरणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. भारतीय निवडणूक आयोगाने घड्याळ हे आमच्या पक्षाचे चिन्ह म्हणून अधिकृत केले आहे. दिशाभूल करणाऱ्या आमच्या चिन्हाचा कोणताही अनधिकृत वापर हा फौजदारी गुन्हा आहे. धंगेकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा.’

Web Title: "Using our party symbol is a criminal act..." Complaint against Ravindra Dhangekar over use of clock symbol