निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:16 IST2026-01-21T17:14:44+5:302026-01-21T17:16:15+5:30

स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

There was no alliance with Shinde Sena before the elections; hence there is no question of giving the post of approved corporator now - Muralidhar Mohol | निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ

निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती; त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच नाही - मुरलीधर मोहोळ

पुणे: महापालिका निवडणुकीत तब्बल ११९ जागा मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. आता स्वीकृत नगरसेवकांबाबत ज्यांना आताच्या निवडणुकीत संधी मिळाली नाही. त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते.
  
शिंदेसेनेला काही संधी देणार आहे का? या स्वीकृत नगरसेवकाच्या प्रश्नावर मोहोळ म्हणाले,  महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेसोबत युती नव्हती, त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

शहर फ्लेक्समुक्त करण्याचा शब्द आम्ही महापालिका निवडणुकीत पुणेकरांना दिला. मात्र, त्यानंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांचे शहरात अनधिकृत फ्लेक्स उभे राहिले आहेत. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. त्यामुळे शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच महापालिकेचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच विद्रुपीकरण थांबवण्यासाठी फ्लेक्समुक्त पुण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, भाजपच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करणारे अनधिकृत फ्लेक्स शहरभर लागले आहेत. यावरून विरोधकांकडून आणि नागरिकांकडून भाजपच्या कथणी आणि करणी यात फरक असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे सांगितले. शहरातील फ्लेक्स किती दिवसांत काढले जातील? या प्रश्नावर मात्र स्पष्ट उत्तर देणे मोहोळ यांनी टाळले.

मोहोळ म्हणाले, आमच्याकडे पुणे महापालिकेसाठी व्हिजन आहे, ते पूर्ण करण्यासह समान पाणीपुरवठा योजना, जायका, नदीकाठ सुशोभीकरण आणि वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य राहील. महापालिकेतील महत्त्वाची पदे मुख्य शहरातील नगरसेवकांना दिल्यास समाविष्ट गावे व उपनगरातील कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, या प्रश्नावर मोहोळ म्हणाले, विकास तेथील लोकप्रतिनिधींना पदे दिली तर होतो, असे काही नाही. सर्वांगीण विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम केले जाणार आहे, त्यामुळे समाविष्ट गावांचाही विकास होईल. 

महाराष्ट्र सहकाराची पंढरी

देशात सहकाराच्या सव्वाआठ लाख संस्था आहेत. त्यातील अडीच लाख संस्था या केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पूर्वी सहकारी संस्था मी आणि माझे कुटुंब यापुरत्याच मर्यादित होत्या. केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहे. मागील दीड वर्षात सहकार क्षेत्रात काम करत असताना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १० हजार कोटींची मदत केली आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक १४ विमानतळ

हवाई वाहतुकीत मोठे काम झाले आहे. लोहगाव विमानतळाचा विस्तार झाला. सेवा सुविधा वाढवण्यात आली. राज्यात १४ विमानतळे झाली आहेत. देशात सर्वाधिक विमानतळे महाराष्ट्रात आहेत. डोमेस्टिक वाहतुकीत आपण दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title : चुनाव से पहले गठबंधन नहीं, पार्षद पद का सवाल नहीं: मोहोळ

Web Summary : मुरलीधर मोहोळ ने स्पष्ट किया कि शिंदे सेना के साथ चुनाव पूर्व गठबंधन नहीं था, इसलिए उन्हें पार्षद पद देने का कोई सवाल ही नहीं है। जलापूर्ति और नदी सौंदर्यीकरण जैसी परियोजनाओं को पूरा करने को प्राथमिकता दी जाएगी। पुणे में अवैध फ्लेक्स हटाने और सभी क्षेत्रों को विकसित करने पर ध्यान केंद्रित किया जाएगा।

Web Title : No alliance before election; no question of corporator post: Mohol

Web Summary : Murlidhar Mohol clarified that since there was no pre-election alliance with Shinde's Sena, there is no question of offering them a corporator post. Priority will be given to completing projects like water supply and river beautification. Focus on removing illegal flex banners in Pune and developing all areas.