...म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका करतात, जयंत पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:00 AM2024-04-30T01:00:01+5:302024-04-30T01:01:14+5:30

सणसर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते.

so Narendra Modi criticizes Sharad Pawar, Jayant Patil's target | ...म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका करतात, जयंत पाटील यांचा निशाणा

...म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका करतात, जयंत पाटील यांचा निशाणा

यंदाची लाेकसभा निवडणुक वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशात साम दाम दंड भेदाची निती वापरुन सत्तेवर येण्याचे ठरविले आहे. मात्र, त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अडसर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांवर टीका करतात, अशी टीका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

सणसर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, शरद पवार यांना  अपशब्द वापरल्याशिवाय मोदींना बोलता येत नाही. पंडीत नेहरुंपासून अटलबिहारी वाजपेयीपर्यंत भाषणे एकली. पण विरोधकांवर एवढ्या टोकाची टीका होताना आपण प्रथमच पाहत आहे. मोदींनी दहा वर्षात काय केले हे सांगावे, पुढील नियोजनाबाबत चर्चा करावी. मात्र,ते यावर बोलत नाहीत. महाराष्ट्रातील जनता यांच्यावर प्रचंड चिडलेली आहे. कारण त्यांनी मराठी माणसांनी उभा केलेले दोन पक्ष फोडल्याची शिक्षा त्यांना द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विकासामुळे तुमच्या आमच्या जीवनात बदल झाला. त्यामुळे पवारांनी काय केले हे त्यांनी विचारु नये. अमित शहांनी गुजरातसाठी काय केले हे सांगावे, त्यामुळे देशाच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला पाटील यांनी शहा यांना लगावला.

जीएसटीच्या रुपात देशाने जाचक कर देशाने सहन केेला. देशात महागाइ,इंधनदरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भाजपच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येते. देशातील बड्या प्रकल्पांचे काम उद्योगपतींना दिले जाते. मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी या सरकारने मेहनत घेतली. २२ लोकांकडे देशाची ७० टक्के संपत्ती गेली आहे. मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत देशावर ५६ लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या १० वर्षात ते कर्ज २१० लाख कोटींवर पोहचले आहे. कर्जामुळे देशाचे उत्पन्न वाढविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. देशाची अर्थव्यवस`था अडचणीत आली आहे.प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर २ लाखांचे कर्ज आहे. ते वसूल करण्यासाठी लुट चालू असल्याची टीका पाटील यांनी केली.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जलतज्ञ प्रफुल कदम, भीमराव भोसले,आबासाहेब निंबाळकर, अॅड तेजसिंह पाटील,सागर मिसाळ आदी उपस`थित होते. प्रास्तविक अमोल भोइटे यांनी तर, आभार अनिकेत निंबाळकर यांनी मानले.
 

Web Title: so Narendra Modi criticizes Sharad Pawar, Jayant Patil's target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.