Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 04:15 PM2024-06-05T16:15:17+5:302024-06-05T16:16:02+5:30

Shirur Lok Sabha Result 2024 राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांची उमेदवारीवर नाराजी असल्याचे प्रमुख कारण समोर

shirur loksabha winning amol kolhe and losses shivajirao adhalrao patil reasons in front | Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

Shirur Lok Sabha Result 2024: बघतोस कसा निवडून येतो, या आव्हानाला स्वीकारत कोल्हेंचा विजय, आढळरावांचा पराभव का झाला?

Shirur Lok Sabha Result 2024शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील  (Shivajirao Adhalarao Patil) यांचा जवळपास १ लाख ४१ हजार १५ मतांनी पराभव करून विजय मिळवला. निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी बघतोस कसा निवडून येतो, या चॅलेंजला अमोल कोल्हे यांनी सुरुंग लावला अन् निवडून आले. कोल्हे यांना ६ लाख ९८ हजार आठशे, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना ५ लाख ५७ हजार ७८५ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी तुतारी वाजवत डाॅ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदारकी बहाल करून दिल्लीला रवाना केले आहे. शिरूर लोकसभेच्या रणांगणात आजी माजी खासदारांमध्ये झालेल्या लढतीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी पहिल्यापासूनच आघाडी घेतल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला व माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर राहिले असून, शरद पवारांच्या बाबतीत असलेली सहानुभूती व निष्ठावंतांनी मोठी कंबर कसली होती. सहा विधानसभांपैकी पाच जागांवर युतीचे दिलीप वळसे पाटील, महेश लांडगे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, चेतन तुपे हे आमदार आढळराव यांच्या बाजूने असताना, केवळ एका आमदार व स्वत:चा असलेला संपर्क याच्या जोरावर कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके वाजवून व एकमेकांना लाडू भरवून जल्लोष केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील फेरीनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे 

पहिली फेरी ६,००० मतांची आघाडी, दुसरी फेरी ९,५५३, तिसरी फेरी ११,१११, चौथी फेरी १८,६७४, पाचवी फेरी २५,०८८, सहावी फेरी २७,०३३, सातवी फेरी ३३,१९४, आठवी फेरी ३६,८१५, नववी फेरी ४४,०६८, दहावी फेरी ४९,७७०, अकरावी फेरी ५३,९४९, बारावी फेरी ५२,५४२, तेरावी फेरी ५५,९४१, चौदावी फेरी ६५,०२५, पंधरावी फेरी ७२,५२५, सोळावी फेरी ७१,९८२, सतरावी फेरी ७६,५८३, अठरावी फेरी ८३,०९३, एकोणिसावी फेरी ९२,६४९, विसावी फेरी १,०४,८७५, एकविसावी फेरी १,१४,८५५, बाविसावी फेरी १,२०,१९४, तेविसावी फेरी १,२६,६५८, चोविसावी फेरी १,३३,७६७, पंचविसावी फेरी २,३६,००५, सव्विसावी फेरी १,३७,४३६, सत्ताविसावी फेरी १,३९,११६, अंतिम फेरीत १,४१,०१५ मतांची आघाडी घेत खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धोबीपछाड देत त्यांचा पराभव केला आहे.

शिरूरमधील जय-पराजयाची कारणे काय?

अमोल कोल्हेंचा विजय कशामुळे?

- शरद पवार यांना असलेली सहानुभूती
- शिवसेना, कॉंग्रेस (आय) पाठिंबा
- संसदेतील भाषणे, कांदा प्रश्न, संसदरत्न पुरस्कार
- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका आणि अभिनेता म्हणून मिळालेला प्रतिसाद
- तडजाेडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी आमदारांचे कार्यकर्ते आले शरद पवार गटात

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव का झाला?

- शिवसेनेतून दोन वेळा पक्षांतर
- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांची उमेदवारीवर नाराजी
- निष्ठावान कार्यकर्त्यांचा अभाव, दिलीप वळसे पाटील यांचा प्रचारात नसलेला सहभाग
- निवडून येण्याचा अतिआत्मविश्वास
- मित्रपक्षांची अपेक्षित ताकद न मिळणे.

Web Title: shirur loksabha winning amol kolhe and losses shivajirao adhalrao patil reasons in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.