Shirur Lok Sabha Result 2024: बदला लेना हम कभी भुलते नही...! शिरूरचा बालेकिल्ला अमोल कोल्हेंनी जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:15 PM2024-06-04T18:15:11+5:302024-06-04T18:16:29+5:30

Shirur Lok Sabha Result 2024 - अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील १ लाखाहूनही अधिक फरकाने पराभूत 

Shirur Lok Sabha Result 2024 amol kolhe win and shivajirao adhalrao patil losses | Shirur Lok Sabha Result 2024: बदला लेना हम कभी भुलते नही...! शिरूरचा बालेकिल्ला अमोल कोल्हेंनी जिंकला

Shirur Lok Sabha Result 2024: बदला लेना हम कभी भुलते नही...! शिरूरचा बालेकिल्ला अमोल कोल्हेंनी जिंकला

Shirur Lok Sabha Result 2024 :  शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीपासून कोल्हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. हि लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु जशा फेऱ्या होत गेल्या त्याप्रमाणे एकतर्फीच आघाडी दिसून आली आहे. (Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil) सुरुवातीला अमोल कोल्हेना १८ ते २० हजारांचा लीड मिळाला होता. तो थेट लाखांच्या घरात पोहोचला. १ लाखाच्या प्रचंड मोठ्या फरकाने डॉ. अमोल कोल्हे निवडून आले. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. 

अजित पवार गटाचे उमेदवार बारामतीत आणि शिरूरमध्ये पिछाडीवर होते. बारामतीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. तर शिरूरमध्ये कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. दोन्हीकडे शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार अशी लढत झाली.  त्यामुळे अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. अशातच कोल्हे यांनी फिल्मी स्टाईल मध्ये शेर टाकला. धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही! हे नक्की असं ते म्हणाले होते. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी 9 व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी 44 हजारावर गेली. पहिल्या फेरीत कोल्हे पाच हजारांची झाली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेच राहिले.अमोल कोल्हे यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यांनी आधीच विजयाची खात्री दिली होती. शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभं करणे हे अजित पवारांना अवघड गेल्याचे दिसून आले आहे. 

शिरुर लोकसभा मतदार संघात युतीचे पाच आमदार तर आघाडीचा एक आमदार असताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार याची चर्चा होती. त्यातच शिरुर मतदार संघातील जातीय समीकरण व अर्थपूर्ण प्रचार यंत्रणा यात कोणाची सरशी होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना कोल्हे यांनी बाजी मारली आहे.

Web Title: Shirur Lok Sabha Result 2024 amol kolhe win and shivajirao adhalrao patil losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.