raj thachery's right of voting bjp wants to remove; serious allegations of panse | राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून टाकण्याचा प्रयत्न ; अभिजित पानसेंचा गंभीर आराेप
राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून टाकण्याचा प्रयत्न ; अभिजित पानसेंचा गंभीर आराेप

पुणे : मुख्यमंत्र्यांनी काल वकीलांना साेबत घेऊन एक बैठक घेतली. त्यात राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील, त्यांच्यावर काेणता गुन्हा दाखल करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच असा काेणता गुन्हा दाखल करता येऊ शकेल का त्यातून त्यांचा मतदानाचा अधिकार काढता येईल याचा विचार सुरु असल्याचा गाेप्यस्फाेट मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी केला. 

पुण्यात राज ठाकरे यांची सभा पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आयाेजित करण्यात आली आहे. त्यावेळी पानसे बाेलत हाेते. मतदानाचा अधिकार काढल्यास महाराष्ट्र  पेटल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे जे पुराव्यांसह दाखवतायेत ते थांबवण्याचं काम करु नका. जर राज ठाकरेंवर खालच्या दर्जाचे आराेप झाले तर तुमची नाच गाणी काढण्यास आम्हाला भाग पाढू नका. ठाकरे जे दाखवतात त्याला सगळे घाबरले आहेत. केवळ व्हिडीओ बघून चालणार नाही तर लाेकांना हे पटवून द्यायला हवे की भाजपाला मतदान करता कामा नये. असेही पानसे यावेळी म्हणाले. 

राज्यातील विविध भागात राज ठाकरे सभा घेत असून त्यातून ते भाजपावर टीका करत आहेत. ठाकरे आपल्या सभांमधून व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाची पाेलखाेल करत आहेत. त्यामुळे ठाकरे सभेत नवीन कुठला व्हिडीओ घेऊन येणार याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. राज ठाकरेंचा लाव रे व्हिडीओ हे वाक्य देखील साेशल मिडीयावर व्हायरल हाेत आहे. पुण्यातल्या सभेत ठाकरे काय बाेलणार आणि कुठला व्हिडीओ दाखवणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागले आहे.


Web Title: raj thachery's right of voting bjp wants to remove; serious allegations of panse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.