जागेचा वाद बेतला जीवावर ; चालत्या ट्रेनमधील मारहाणीत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 16:11 IST2020-02-13T16:07:18+5:302020-02-13T16:11:09+5:30
ट्रेनमध्ये बसायच्या जागेवरून सुरु झालेल्या वादामुळे केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

जागेचा वाद बेतला जीवावर ; चालत्या ट्रेनमधील मारहाणीत तरुणाचा मृत्यू
पुणे : ट्रेनमध्ये बसायच्या जागेवरून सुरु झालेल्या वादामुळे केलेल्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर मरकड (वय २६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दौंड येथे गुन्हा दाखल करण्याचे सुरु असून १२ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई- लातूर- बिदर एक्सप्रेस दरम्यान ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'बुधवारी रात्री पाऊणच्या सुमारास ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून वादाला सुरुवात झाली. वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर थेट मारामारीत झाले. त्यावेळी काही व्यक्तींनी सागर याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत जखमी झालेल्या सागरला पुढील स्टेशन असलेल्या दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या प्रकरणी पोलिसांनी १२ व्यक्तींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.