Pune Municipal Corporation: तिकीट हुकलं, पराभव झाला; आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची जाेरदार मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:10 IST2026-02-23T13:09:52+5:302026-02-23T13:10:14+5:30

Pune Municipal Corporation पक्षीय बलाबलनुसार भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे १ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत

Pune Municipal Corporation Lost ticket, defeated; now aspirants are building a strong front for the accepted corporator post | Pune Municipal Corporation: तिकीट हुकलं, पराभव झाला; आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची जाेरदार मोर्चेबांधणी

Pune Municipal Corporation: तिकीट हुकलं, पराभव झाला; आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची जाेरदार मोर्चेबांधणी

पुणे : पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली आहे. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे १ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. या पदासाठी आतापर्यंत एकूण १९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपचे ११९, दोन्ही राष्ट्रवादी ३०, काँग्रेस १५ आणि उद्धवसेनेचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. 

पुणे महापालिकेत २०१७ साली स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच होती. पण, २०२३ ला राज्य सरकारने या आदेशात बदल केला. त्यानुसार पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली आहे. पक्षीय बलाबलनुसार भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे १ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. आता सगळ्यांनाच स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध लागले आहेत. तिकीट हुकलं, पराभव झाला, यंदा संधी मिळाली नाही, पक्षाने थांबण्याच्या सूचना दिलेले असे सर्वजण आपल्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडावं यासाठी फिल्डिंग लावली आहे. आता स्वीकृत नगरसेवकांनाही महापालिकेकडे कोणतीही थकबाकी/देणी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य आहे. या सुविधेसाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत या माध्यमातून एकूण १९३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महापालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या अनेक नेत्यांनी आपली वर्णी स्वीकृत नगरसेवकपदी लागेल यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती; मात्र यापूर्वीच भाजप नेतृत्वाने पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तरीही काहींनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शहरातील भाजपचे प्रत्येक आमदार आणि खासदार हा एक नाव सुचवणार असून त्यानंतर त्यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title : पुणे: टिकट चूका, हार हुई; अब सहयोजित पार्षद पद के लिए ज़ोरदार लॉबिंग

Web Summary : पुणे महानगरपालिका में अब दस सहयोजित पार्षद होने से इच्छुक लोग लॉबिंग कर रहे हैं। भाजपा को 7, एनसीपी को 2, कांग्रेस को 1 मिलेगा। भाजपा के इनकार के बावजूद कई पराजित उम्मीदवार कोशिश कर रहे हैं, प्रत्येक नेता नाम प्रस्तावित कर रहा है।

Web Title : Pune: Missed Ticket, Defeated; Now Lobbying for Co-opted Councillor Post.

Web Summary : With ten co-opted corporators now in Pune Municipal Corporation, aspirants are lobbying hard. BJP gets 7, NCP 2, Congress 1. Despite BJP's stance against defeated candidates, many are trying, with each leader proposing names.