Pune Election 2019 : I will get 1 lakh 60 thousands voting lead in kothrud | पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

पुणे : कोथरूड मतदारसंघातल्या निवडणुक राज्यातील सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे इथून निवडणूक लढवत असून त्यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या वतीने मनसेचे उमेदवार किशोर यांना पाठिंबा दिला आहे. कोथरुडकरांवर बाहेरचा उमेदवार लादला गेला असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केला. त्याला प्रत्युत्तर देत पाटलांनी मी पुणेकर कसा हे ही संदर्भासहित स्पष्ट केले. मात्र तरीही प्रचार सभांच्या काळात आरोप प्रत्यारोपाने गाजलेल्या या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी मतदान केल्यावर १ लाख साठ हजार मताधिक्याने निवंडून येईल असा आत्मविश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 
 पुण्यात त्यांनी मतदान केल्यानंतर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले , ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड. 2014 पासून भाजपाचा ट्रेंड आहे लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास वाढत चालला आहे. आजचा मतदारांचा उत्साह अवर्णनीय आहे. लोकांची देहबोली भाजपचे सरकार येईल अशी आहे.
त्यामुळेच मला या निवडणुकीत 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल असा  विश्वास आहे. तसेच हवा बदलल्याचे फक्त शरद पवार यांना दिसत आहे. त्यांच्या मागच्यांना पण दिसत नाही.

काेथरुडच्या जागेसाठी विराेधक एकवटले ; काॅंग्रेस - राष्ट्रवादीने दिला मनसेला पाठींबा
चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे.कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर १९८२ पासून १३ वर्षे विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगतिले होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pune Election 2019 : I will get 1 lakh 60 thousands voting lead in kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.