परवानगी न घेता मिरवणूक काढली; पुण्यात राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:36 IST2026-01-19T17:35:56+5:302026-01-19T17:36:50+5:30
जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत

परवानगी न घेता मिरवणूक काढली; पुण्यात राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : कोणतीही परवानगी न घेता मिरवणूक काढल्याने जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक सूरज लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १७ ) जाहीर झाला. जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास जनता वसाहत परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. विजयानंतर शहरात मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली होती. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार आदक तपास करत आहेत.
दरम्यान पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती. भाजप, शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सभांचा धडाका लावला होता. दोन्हीकडे भाजपवर टीकाही केली होती. अखेर पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली आहे.