PMC Election Results 2026: एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:57 IST2026-01-17T12:56:43+5:302026-01-17T12:57:32+5:30

PMC Election Results 2026 पठारे, मानकर, आंदेकर, वांजळे, टिळक, निम्हण असे विजयी उमेदवार महापालिकेतील सभागृहात पाठवले आहेत

PMC Election Results 2026 The tradition of having more than one person continues this year; Husband and wife, two brothers, mother-in-law and daughter-in-law will be seen in Pune Municipal Corporation | PMC Election Results 2026: एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई

PMC Election Results 2026: एकापेक्षा अधिकची परंपरा यंदाही कायम; पुणे महापालिकेत दिसणार पती-पत्नी, दोन भाऊ, सासू अन् सुनबाई

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत एकाच घरातील एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची परंपरा यावेळीही कायम आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पती-पत्नी, दोन-भाऊ, सासू अन् सून विजयी झाल्याने आता पती-पत्नीसह सासू अन् सुनबाईही सभागृहात दिसणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ विमाननगर लोहगावमधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, तर प्रभाग क्रमांक ४ खराडी वाघोलीमधून भाजपचे सुरेंद्र पठारे विजयी झाले आहेत. यामुळे प्रभाग ३ मधील हे पती-पत्नी आता थेट सभागृहात दिसणार आहेत. प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे हर्षवर्धन दीपक मानकर, तर प्रभाग क्रमांक २५ मधून महात्मा फुले मंडईमधून भाजपचे राघवेंद्र मानकर हे दोघे बंधू विजयी झाले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक २३ रविवारपेठ, नाना पेठमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सोनाली आंदेकर ‘अ’मध्ये आणि ‘ब’ प्रवर्गात लक्ष्मी आंदेकर सून आणि सासू विजयी झाल्या आहेत.

गुन्हेगारी कुटुंबातील दोन महिला सभागृहात

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील तीन महिला उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून (अजित पवार) निवडणूक लढविली. नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर या दोघी सून, तसेच सासू प्रभाग २३ रविवारपेठ नानापेठमधून निवडणुकीला उभ्या होत्या. प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनीमधून कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे निवडणूक लढवित होत्या. मारणे यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक ३९ मध्ये राष्ट्रवादीकडून (अजित पवार) गुंड बापू नायर निवडणूक लढवत होते, पण नायर यांचा पराभव झाला आहे. त्यापैकी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या विजयी होऊन सभागृहात गेल्या आहेत.

आजी-माजी आमदार पुत्र आले निवडून

पालिका निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार निवडणुकीत विजयी झाले आहेत. मुलासह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (शरद पवार) बापू पठारे यांचा मुलगा युगेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपकडून विजयी झाले आहेत.

Web Title : पीएमसी चुनाव: पारिवारिक रिश्ते मजबूत; पुणे चुनाव में पति-पत्नी, भाई जीते

Web Summary : पुणे के पीएमसी चुनाव में परिवार के सदस्यों की जीत। पति-पत्नी, भाई और सास-बहू ने सीटें हासिल कीं। आपराधिक पृष्ठभूमि वाले कुछ उम्मीदवार भी जीते। पूर्व और वर्तमान विधायकों के बच्चे भी विजयी हुए, जिससे पुणे की राजनीति में पारिवारिक विरासत जारी है।

Web Title : PMC Election: Family Ties Strong; Spouses, Siblings Win Pune Elections

Web Summary : Pune's PMC election sees family members winning. Spouses, siblings, and a mother-in-law with daughter-in-law secured seats. Some candidates with criminal backgrounds also won. Children of former and current MLAs also emerged victorious, continuing the family legacy in Pune politics.