PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 18:44 IST2026-01-16T18:43:32+5:302026-01-16T18:44:24+5:30

PMC Election Results 2026 राज्यात ‘गुन्हेगारीमुक्त राजकारण’ आणि ‘गुंडांना थारा देऊ नका’ अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी जयश्री यांना उमेदवारी दिल्याने जोरदार टीका होऊ लागली होती

PMC Election Results 2026 Gajanan Marane wife jayshree marne was not given a ticket; citizens responded through voting, Jayashree Marane was defeated | PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

PMC Election Results 2026: गजा मारणेच्या पत्नीला तिकीट देणं नडले; नागरिकांनी मतदानातून उत्तर दिले, जयश्री मारणेंचा पराभव

पुणे : पुण्यात आंदेकर, गजा मारणे, बापू नायर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडांच्या कुटूंबियांना तिकीट दिल्याने अजित पवारांवर टीकाही होऊ लागली होती. मात्र या तिघांमध्ये आंदेकर यांनी आपले वर्चस्व राखले असून रविवार पेठ - नाना पेठ भागातून निवडून आले आहेत. तर गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांचा पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जयश्री मारणे यांना बावधनमधील प्रभाग क्रमांक १० मधून पक्षाने अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. अशा गुंडाच्या घरात उमेदवारी देण्यात आल्याने आता पुणेकरांनी संताप व्यक्त केला. अशातच मोक्काचा गुन्हेगार बापू नायर आणि जयश्री मारणे यांचा पराभव झाला आहे. 

जयश्री मारणे यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तिकिटावर कोथरूडमधून निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण मध्यंतरी गजा मारणेवर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर राज्यात ‘गुन्हेगारीमुक्त राजकारण’ आणि ‘गुंडांना थारा देऊ नका’ अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी कुख्यात गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली होती. अखेर या टीकेचे उत्तर नागरिकांनी मतदानातून दिले. आणि जयश्री मारणे यांचा बावधन प्रभाग १० मधून पराभव झाला आहे.   

Web Title : गजा मारणे की पत्नी को टिकट देना उल्टा पड़ा; नागरिको का जवाब, पराजित।

Web Summary : राष्‍ट्रवादी कांग्रेस द्वारा गजा मारणे की पत्नी जयश्री मारणे को टिकट देना भारी पड़ा। नागरिकों ने मतदान में जवाब दिया, जिसके कारण उनकी हार हुई। आंदेकर जीते, पर आपराधिक पृष्ठभूमि वाले उम्‍मीदवारों को मतदाताओं ने खारिज कर दिया।

Web Title : Gaja Marne's wife's ticket backfired; citizens respond through voting, defeated.

Web Summary : NCP's ticket to Gaja Marne's wife, Jayashree Marne, backfired. Citizens responded in the election, leading to her defeat. While Andekar won, voters rejected candidates with criminal backgrounds, despite Ajit Pawar's support.