PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:59 IST2026-01-16T13:59:08+5:302026-01-16T13:59:27+5:30
PMC Election Results 2026 जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे

PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे.
पुण्यात प्रभाग २५ मधून भाजपने आघाडी घेतली होती. कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर आणि स्वप्नाली पंडित हे भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र त्या प्रभागात मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. त्यामधूनच रुपाली ठोंबरे पाटील आणि गणेश भोकरे यांनी आक्षेप घेतला. आकडेवारी जुळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरु केली. त्यावेळी रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार टाकला आहे. सर्व भाजपचे उमेदवार आतमध्ये आहेत आम्ही बाहेर आलो आहोत असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुण्यात प्रभाग 25 मध्ये गोंधळ; उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक, थेट गेटवर चढल्या #PuneElection2026#BJP#NCPpic.twitter.com/UTX63nJfHE
— Lokmat (@lokmat) January 16, 2026
रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी सुरु असलेल्या शाळेत गेटवर चढून स्टंटबाजी केल्याचे दिसून आले आहे. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचे म्हणत गोंधळ केला आहे. तसेच मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांच्यसह इतर उमेदवारांनी केला आहे.