PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:53 IST2026-01-15T19:51:09+5:302026-01-15T19:53:45+5:30
Pune Municipal Election Exit Poll 2026: राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्तेत बसणार असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे.

PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या पुणे महापालिकेत कोण सत्तेवर बसणार, याचे उत्तर काही तासांतच मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलने निकालाचे अंदाज मांडले आहेत. दोन एक्झिट पोलने पुण्यात भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातच थेट लढत होत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा पुण्याची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील का? याकडे सगळ्याचे लक्ष आहे.
दरम्यान, एक्झिट पोलने पुणे महापालिकेची सत्ता कायम राखण्यात भाजपा यशस्वी होण्याचा अंदाज मांडला आहे. प्राबच्या (पॉलिटिकल ब्युरो अँड अॅनालिसिस ब्युरो) एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल असा कौल दिला आहे.
कोण किती जागा जिंकू शकते?
भाजपा - ९१
राष्ट्रवादी (अजित पवार) - ४३
शिवसेना - ७
काँग्रेस ८
राष्ट्रवादीला ५५ जागांचा अंदाज
सामच्या एक्झिट पोलने मात्र वेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यांच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा ७० जागा जिंकेल, शिंदेसेना १२ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ५५ जागा, काँग्रेसला ८ जागा, उद्धवसेना ५ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागा, मनसेला २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर?
पिंपरी चिंचवड महापालिकेचा पोल समोर आला असून, त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल. शिंदेसेनेला ५, तर उद्धवसेनेला २ जागा मिळतील, असा कौल या एक्झिट पोलने दिला आहे.