PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:00 IST2026-01-14T17:00:13+5:302026-01-14T17:00:31+5:30

PMC Election 2026 शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत

PMC Election 2026 Pune Police tighten security ahead of municipal elections; Property worth crores seized | PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून व्यापक बंदोबस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन राबविण्यात आले आहे. शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ३ हजार २५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. शहरातील ८८ सेक्टर निश्चित करून संवेदनशील भागात विशेष दक्षता घेतली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान १८ स्थिर, १५ फिरते व १५ व्हिडीओ सर्वेक्षण पथकांद्वारे सतत नजर ठेवण्यात येत असून या कारवाईत आतापर्यंत ६७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विविध प्रतिबंधात्मक कायद्यांखाली एकूण ३ हजार ४३९ कारवाया करण्यात आल्या आहेत. दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करून १ कोटी २३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थविरोधी मोहिमेत एमडी, गांजा, चरस व नशेच्या गोळ्यांसह सुमारे २६ लाख ८४ हजार ७२९ रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. निवडणूक काळात १५ अग्निशस्त्रे, १५ काडतुसे व २९ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून ३ हजार २९४ परवाना धारकांची शस्त्रे तात्पुरती जमा करून घेण्यात आली आहेत. याशिवाय शहरात ३१३ अजामीनपात्र वॉरंट्स बजावण्यात आले आहेत.

मतदान स्लिप वाटप, चांदीच्या वस्तूंचे वाटप आणि पैशांचे वाटप या संदर्भातील १७ गुन्हे दाखल करून २ लाख ६ हजार ३५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत हिंसाचाराचा एकही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title : पुणे नगर निगम चुनाव 2026: पुलिस की कड़ी सुरक्षा, करोड़ों जब्त

Web Summary : पुणे पुलिस ने आगामी नगर निगम चुनावों के लिए सुरक्षा बढ़ाई, हजारों अधिकारी तैनात। करोड़ों की नकदी, शराब, ड्रग्स और हथियार जब्त किए गए। निवारक कार्रवाई की गई, हजारों वारंट जारी, हिंसा की कोई खबर नहीं, निष्पक्ष चुनाव सुनिश्चित।

Web Title : Pune Police Tighten Security for 2026 PMC Elections, Seize Crores

Web Summary : Pune police ramp up security for the upcoming PMC elections, deploying thousands of officers. Crores worth of cash, liquor, drugs, and weapons have been seized. Preventive actions taken, thousands of warrants executed, and no violence reported so far, ensuring fair elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.