Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:00 IST2026-01-02T11:59:43+5:302026-01-02T12:00:51+5:30
शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत.

Ajit Pawar: बंडखोरांना थंड करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु; फोनही लावले, १० ते १२ जण अजित पवारांच्या भेटीला
पुणे : पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी दिवसभरात ६७ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये ३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (दि.२) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले आहेत. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात प्रवेश केला. काही माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विशेष करून बंडखोरी केलेल्यांचे बंड शमविण्यात यश येणार का हे आजच स्पष्ट होणार आहे.
अजित पवारांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. दहा ते बारा बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. आणखी पंधरा बंडखोर उमेदवारांना अजित पवारांनी निरोप पाठवले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत बंड थंड करण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरु राहणार आहेत.
पुणे आणि पिंपरीत पत्रकार परिषद
आज पिंपरी चिंचवड तर उद्या पुण्यात अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. पुणे-पिंपरी चिंचवडचे व्हिजन अजित पवार पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या चुका व पुढे करण्यात येणारी विकासकामे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप सत्ता आहे. भाजपा सत्ता काळात काय चुकले हे पत्रकार परिषद सांगितले जाणार आहे. अप्रत्यक्षरीत्या भाजप कारभारावर अजित पवार ताशेरे ओढणार असल्याची माहिती समोर आली आहे.