दौंड तालुक्यात जनावरांच्या गोठ्यावरील परप्रांतीय युवकाची हत्या; मृतदेह आढळला विहिरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:23 IST2023-07-24T14:37:46+5:302023-07-24T15:23:46+5:30
जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला

दौंड तालुक्यात जनावरांच्या गोठ्यावरील परप्रांतीय युवकाची हत्या; मृतदेह आढळला विहिरीत
पाटेठाण : राहू (ता.दौंड) नजीक असलेल्या सोनवणे मळा येथील एका जनावरांच्या गोठ्यात कामाला असलेल्या परप्रांतीय युवकाची हत्या करुन मृतदेह जवळच्याच विहिरीत टाकून दिल्याची झाल्याची घटना सोमवार (दि.२४) रोजी उघडकीस आली आहे. भीमकुमार यादव (रा.जयपूर बिहार- वय ३५ ) असे हत्या झालेले युवकाचे नाव आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राहू-वाघोली रस्ते मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक असलेल्या सोनवणे बंधूंच्या जनावरांच्या गोठ्यात कामाला असलेला युवक भीमकुमार यादव (रा.जयपूर बिहार- वय ३५) आहे. जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. राहू गावचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव,यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.