बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 07:02 IST2024-04-09T07:01:24+5:302024-04-09T07:02:34+5:30

सुप्रिया सुळे : आम्ही रडणार नाही लढणार

Intimidation of citizens in Baramati; Supriya Sule's allegation | बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप

बारामतीत नागरिकांना धमकावण्याचे उद्योग; सुप्रिया सुळेंचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला.

येथील स्वाभिमानी जनता धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही व गप्पही बसणार नाही. हा महाराष्ट्र सूडाचे राजकारण खपवून घेणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे भोर, पुरंदर, मुळशी तालुक्यातील रहिवाशांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सुळे यांनी भाजपसह महायुतीवर टीकेची झोड उठविली. ऐन उन्हाळ्यात या सरकारने वीज महाग केली. महागाई, बेरोजगारी, नागरिकांच्या समस्या या विषयांवर ते बोलण्यास तयार नाहीत. जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. आम्ही रडणार नाही लढणार, नव्या ताकदीने उभे राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Intimidation of citizens in Baramati; Supriya Sule's allegation