लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

By नितीश गोवंडे | Published: May 11, 2024 02:19 PM2024-05-11T14:19:20+5:302024-05-11T14:20:02+5:30

शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली...

In the wake of the Pune Lok Sabha polls, the crime branch has cleared the goons | लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस 'एक्शन मोड'वर; गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती

पुणे :पुणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने गुंडांची ‌झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर पडलेले सराइत, तसेच त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शहरात गेल्या काही दिवसात गाेळीबाराच्या घटना घडल्या. टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी (१३ मे) आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दररोज मध्यरात्री पोलिसांकडून तपासणी मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवण्यात येत असून, गुंडांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, वानवडी, लोणी काळभोर परिसरातील सराइतांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून दररोज रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागातील सराईतांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी सराईतांची माहिती त्वरित जवळचे पोलिस ठाणे अथवा पोलिस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात सराईतांची तपासणी करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या माेहिमेत गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस ‌ठाण्यांतील पथकांचा देखील सहभागी आहे.
- अमाेल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Web Title: In the wake of the Pune Lok Sabha polls, the crime branch has cleared the goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.