जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 02:26 PM2024-04-09T14:26:22+5:302024-04-09T14:27:22+5:30

मी धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा दिलाच नसता

If someone is threatened the concerned should file a police case Ajit Pawar targets Sharad Pawar | जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

बारामती: तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता. अशा पध्दतीने धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा दिलाच नसता, असे करायचे नसते. संस्था चालविताना संस्थेच्या पध्दतीने चालवायची असते व राजकारण करताना राजकारणाच्या पध्दतीने करायचे असते. जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी. पोलीस त्याबाबतची चाैकशी करुन कार्यवाही करतील, अशी पप्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली  आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता कोणाच्या दमबाजीला घाबरु नका, जे तुम्हाला दम देत आहेत त्यांना त्या जागेवर कोणी बसवले, हे तुम्हाला अधिक सांगायची गरज नाही, असा टोला लगावला होता. यावर सोमवारी जिरायती भागाच्या दाैऱ्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी  मंगळवारी(दि ९) बारामती दाैर्यावर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रीया व्यक्त केली.

विजय शिवतारे यांच्या मागण्यांबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या केल्या होत्या .त्याच वेळी त्यांनी त्यांच्या भागात त्यांच्या कार्यकर्त्यांचा पुरंदरवासियांचा मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. आम्ही बोलतो तसे वागतो, आम्ही बदलत नाही. आज एक बोलायचे, उद्या दुसरे बोलायचे. पुन्हा बोललेलं होऊ द्यायच नाही, तसे नाही, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टोला लगावत अजित पवार यांनी आम्ही शब्दाला जागून तिघेही जाणार असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाइ नरेंद्र मोदी विरुध्द उध्दव ठाकरे असे नमुद केले आहे. यावर पवार यांनी पत्रकारांनाच तुम्हाला तरी खरंच अस वाटत का, असे मिश्कीलपणे हसत प्रतिप्रश्न केला. एकवेळ हि लढाइ नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी आहे, असे ते म्हणाले असते तर ते मान्य करता आले असते. पण त्यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेेर नाही, त्यामुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे, असा टोला पवार यांनी राऊत यांना लगावला.

चांगली गोष्ट,शुभेच्छा....

जानाइ शिरसाइ योजनेबाबत आता आपण स्वत: लक्ष घालणार आहोत. ज्यांना अधिकार, जबाबदारी दिली.त्यांनी काम केले नाही. काम कस होत नाही बघतो, मी ते काम पाहणार असल्याचा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवार यांनी ‘चांगली गोष्ट, शुभेच्छा. या तीन शब्दात प्रतिक्रीया व्यक्त केली. नाशिक, सातारा येथील जागेबाबत महायुतीचे वरीष्ठ बसतील, त्यांनतर तोडगा काढला जाईल. त्यानंतर माध्यमांना माहिती दिली जाइल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Web Title: If someone is threatened the concerned should file a police case Ajit Pawar targets Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.