दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून आजोबांच्या डोक्यात बॅट घालून निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:42 IST2022-08-21T15:42:08+5:302022-08-21T15:42:16+5:30

आरोपी प्रथमेश पारठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Grandfather brutally murdered with a bat on his head for not paying for alcohol | दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून आजोबांच्या डोक्यात बॅट घालून निर्घृण खून

दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून आजोबांच्या डोक्यात बॅट घालून निर्घृण खून

भोर : दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणुन एका वृद्ध आजोबांचा नातवाने डोक्यात बॅट घालून निर्घुन खून केल्याची घटना आपटी (ता.भोर) येथे काल राञी आठ वाजता घडली. खुन करुन नातु फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत दत्तु कोंडीबा पारठे (वय ५८ रा आपटी ता भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर महाड रस्त्यावरील आपटी येथे २० आँगस्टला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रथमेश आनंदा पारठे (वय २०, रा.आपटी. ता. भोर ) याने आजोबा नथु दगडु पारठे (वय ७०, रा. आपटी,ता. भोर) यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र, आजोबाने पैसे दिले नाहीत म्हणुन त्याचा राग येऊन नातवाने त्यांच्याच घरासमोर आजोबांच्या डोक्यात बँटने मारुन खून केला. दत्तू कोंडीबा पारठे यांना तुम्ही इथे थांबायचे नाही असा दम देऊन नातू फरार झाला आहे. या प्रकरणी आरोपी प्रथमेश पारठे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे करीत आहेत.

Web Title: Grandfather brutally murdered with a bat on his head for not paying for alcohol