VIDEO | "देवेंद्र फडणवीसांची व्यापाऱ्यांना दमदाटी; आमच्याकडे व्हिडिओ..." नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 16:42 IST2023-02-21T16:32:32+5:302023-02-21T16:42:30+5:30
माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला...

VIDEO | "देवेंद्र फडणवीसांची व्यापाऱ्यांना दमदाटी; आमच्याकडे व्हिडिओ..." नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
पुणे :पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार सर्व पक्षांकडून जोरदार सुरू आहे. त्यामध्ये दोन्हींकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहांनीही पुण्याचा दौरा केला होता. जरी त्यांनी त्यावेळी प्रचारसभा घेतली नसली तर त्यांनी पक्षातील नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील यांच्याही बैठका होत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.
पटोले म्हणाले, भाजपच्या नेत्यांना सत्तेच्या मस्तीत बेताल वक्तव्य करत आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपची हार नक्की आहे त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. भाजपकडून विरोधकांना संपविण्याचे काम सुरू आहे. संजय राऊत आणि अशोक चव्हाणांच्या तक्रारीकडे लक्ष घातले पाहिजे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी फक्त राजकारण केले. त्यांच्या कामकाजाचे चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सविंधानिक पदावर असताना त्यांनी बेताल वक्तव्ये केली, असंही पटोले म्हणाले.
"देवेंद्र फडणवीसांकडून सत्तेचा गैरवापर..."
कसबा पोटनिवडणूक प्रचारवेळी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेचा दुरूपयोग केला आहे. फडणवीसांनी जीएसटीचे अधिकारी, पुण्यातील व्यापारी यांनी दमदाटी केली आहे. त्यांना चिंचवड आणि कसबा निवडणुकीत व्यापाऱ्यांनी मदत करण्यासाठी धमकावलं जात आहे. तसेच कसब्यात भाजपकडून काही मंत्र्यांनी तडीपार गुंडांना सोबत घेऊन फेरफटका मारला आहे. गुंड समोर आणून, व्यापाऱ्यांना धमकावून भाजपकडून प्रचार केला जातोय.