Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:56 AM2024-06-11T09:56:38+5:302024-06-11T09:59:36+5:30

Pune Lok Sabha 2024 पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा

Deposits of 33 persons except murlidhar mohol ravindra dhangekar seized Votes for 31 people within a thousand in pune lok sabha 2024 | Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

Pune Lok Sabha 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना (Ravindra Dhangekar) चितपट केले. 

 भारतीय घटनेने देशात प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार मिळवत पुणे शहरात प्रमुख पक्षांसह लहान मोठ्या पक्षांचे, तसेच अपक्ष असे मिळून ३५ उमेदवार लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, यापैकी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर वगळता ३३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सन २०१९ च्या निवडणुकीत ३१ उमेदवार रिंगणात होते. यापैकी २९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले हाेते.

१ निवडणूक लढण्यासाठी २५ हजार डिपॉझिट 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज सादर करताना स्वत:ची माहिती, मालमत्ता विवरण पत्र, प्रतिज्ञापत्र व साेबत २५ हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

यांचे झाले डिपॉजिट जप्त 

उमेदवार - मिळालेली मते

वसंत मोरे : ३१ हजार ९९१
प्रशांत रणपिसे : ३९६९
अनिस सुंडके : ८५९
मिलिंद कांबळे : ३४४
नीरज कामठाण : ३५१
मनोज वेताळ : ३५१
युवराज लिंबाेळे : ६९८
विजयालक्ष्मी सिंदगी : २३९
सुब्रोतो राॅय : २९३
सुरेश पाटील : ४३७
हेमंत पाटील : ३७४
अश्विनी खैरनार : ४१२
मारुती आंबोरे : ४३३
संदीप चोरमोले : १६५५
गाेरख घोडके : १४५१
किरण रायकर : १०५२
चंद्रकांत सावंत : ३१४
जॉन्सन कोल्हापुरे : ३०४
डॉ. देवयानी पंडित : ६४५
नरेंद्र पावटेकर : ५३३
रज्जाक बागवान : १४६
बाबा सय्यद : १६३
डॉ. बाळासाहेब पोळ : २५९
महेश म्हस्के : २२९
यबिस तुजारे : २२३
ॲड. योगेश मकाने : २९८
विजय जगताप : ३८२
सब्बीर तांबोळी : ३१३
सचिन धनकुडे : ७८८
सागर पोरे : ५१५
संजय केंडाळे : ३११
झोंशो विजय प्रकाश : १३८

Web Title: Deposits of 33 persons except murlidhar mohol ravindra dhangekar seized Votes for 31 people within a thousand in pune lok sabha 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.