Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; १५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:03 IST2023-04-08T12:03:27+5:302023-04-08T12:03:55+5:30
बस चालकाच्या चुकीमुळे बस महामार्ग व सेवा रस्त्याच्या दरम्यान मोरीत जाऊन पडली....

Pune | पुणे-सोलापूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; १५ पेक्षा जास्त प्रवाशी जखमी
कुरकुंभ (पुणे) : कुरकुंभ व मळद ता.दौंड च्या हद्दीतील घागरे वस्तीजवळ पहाटे सहाच्या सुमारास खाजगी बसचा अपघात झाला. बस चालकाच्या चुकीमुळे बस महामार्ग व सेवा रस्त्याच्या दरम्यान मोरीत जाऊन पडली. यामध्ये जवळपास पंधरा पेक्षा जास्त प्रवाशी जखमी असून त्यांना दौंड, भिगवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चैत्र पौर्णिमेला तुळजापूर, येरमाळा येथील देवदर्शन करून बस पुण्याकडे जात होती. यामधील सर्व भाविक प्रवाशी भवानीपेठ, पुणे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी देखील तत्परतेने धाव घेत जखमींना बाहेर काढले. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.