उमदेवारी नाकारल्याने पुण्यात भाजपच्या नाराज इच्छुकांनी घड्याळाकडे वाटचाल; ६ माजी नगरसेवकांचे प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:53 IST2025-12-29T18:52:56+5:302025-12-29T18:53:40+5:30
भाजपकडून थेट फोन करून एबी फॉर्मही पोहच करण्यात आल्याने उमेदवारी नाकारलेले अनेक जण नाराज झाले आहेत

उमदेवारी नाकारल्याने पुण्यात भाजपच्या नाराज इच्छुकांनी घड्याळाकडे वाटचाल; ६ माजी नगरसेवकांचे प्रवेश
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भाजपसह अन्य पक्षांनी तिकिट नाकारलेल्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची वाट धरली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनिता गंलाडे, भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव, संदीप ज०हाड तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ॲड. निलेश निकम, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे भाजपने उमदेवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी घडयाळाची वाट धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद वाढली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना थेट फोन करून एबी फॉर्मही पोहच करण्यात आले. त्यामुळे भाजपमधील उमेदवारी नाकारलेले अनेक जण नाराज झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार, धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सुनिता गंलाडे, संदीप ज०हाड यांनही अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ॲड. निलेश निकम आणि कॉग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट आणि मनसेचे जयराज लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.