Pune Municipal Corporation: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 13:58 IST2026-02-23T13:57:48+5:302026-02-23T13:58:26+5:30

Pune Municipal Corporation निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच टिंगरे यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे अर्ज सादर केला; परंतु तो नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट उशिरा दाखल झाल्याने अवैध ठरवण्यात आला

BJP corporator Srinath Bhimale elected unopposed for the post of chairman of Pune Municipal Corporation Standing Committee | Pune Municipal Corporation: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड

Pune Municipal Corporation: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र तो एक मिनिट उशिरा सादर झाल्याचे कारण देत निवडणूक अधिकारी तथा एसआरए आयुक्त सतीशकुमार खडके यांनी तो अवैध ठरवला. परिणामी भिमाले यांची निवड बिनविरोध झाली.

१६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य असल्याने अध्यक्षपदाची निवड जवळपास औपचारिक मानली जात होती. भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर तीन सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुहास टिंगरे यांना रिंगणात उतरवले होते. निवडणूक प्रक्रियेसाठी एसआरएचे आयुक्त सतीशकुमार खडके यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच टिंगरे यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे अर्ज सादर केला; परंतु तो नियोजित वेळेपेक्षा एक मिनिट उशिरा दाखल झाल्याने अवैध ठरवण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर तसेच काँग्रेसचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी टिंगरे हे अर्ज दाखल करण्यापूर्वीच नगरसचिव कार्यालयात उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरावा, अशी मागणी केली. मात्र निवडणूक अधिकारी खडके यांनी अर्ज अवैध ठरवण्याचा निर्णय कायम ठेवत श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

Web Title : भाजपा के श्रीनाथ भिमाले पुणे निगम समिति के निर्विरोध अध्यक्ष चुने गए

Web Summary : भाजपा के श्रीनाथ भिमाले पुणे महानगरपालिका की स्थायी समिति के निर्विरोध अध्यक्ष चुने गए क्योंकि राकांपा का नामांकन देर से आने के कारण खारिज कर दिया गया। चुनाव अधिकारी द्वारा निर्णय लिया गया, जिससे समिति पर भाजपा की पकड़ मजबूत हो गई।

Web Title : BJP's Shrinath Bhimale Elected Unopposed as Pune Corporation Committee Head

Web Summary : Shrinath Bhimale of BJP was elected unopposed as the Pune Municipal Corporation's Standing Committee Chairman after NCP's nomination was rejected for being late. The decision was made by the election officer, solidifying BJP's hold on the committee.