Baramati Lok Sabha Result 2019: Supriya Sule leading on kanchan kul in baramati | बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..?
बारामती लोकसभा निकाल २०१९ :  बारामतीच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचा बोलबाला..कांचन कुल घालतील गवसणी चमत्काराला..?

बारामती: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, बारामतीमध्येसुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ३,९०,८९६  मतं मिळाली असून कांचन कुल यांच्या पारड्यात यांच्या पारड्यात ३, ११, १७४ मतं पडली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होत असते.सकाळी मतमोणीला सुरुवात झाल्यानंंतर पहिल्या फेरीत कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात काही काळ चिंतेचे वातावरण होते. परंतु पुढे भाजपचे मताधिक्य कमी होऊन पारडे सुळे यांच्या बाजुने झुकु लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. त्यानंतर प्रत्येक फेरीअखेर सुळे यांना मोठ्या संख्येने आघाडी मिळत असल्याचे दिसून आले. पाचव्या फेरीनंतर देखील सुळे यांना 17 हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. बारामती आणि इंदापूर मतदारसंघातून मिळालेले हे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना विजयश्री खेचून आणण्याकरिता महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. 

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांना महादेव जानकरांनी चुरशीची लढत दिली होती. 2009 साली देशात तिसऱ्या क्रमांकाची व राज्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या सुळे यांना 2014 साली फक्त 69 हजार 666 एवढे  मताधिक्य मिळाले. त्यांना एकूण 5 लाख 21 हजार 562 मते मिळाली होती, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मते मिळाली होती...


Web Title: Baramati Lok Sabha Result 2019: Supriya Sule leading on kanchan kul in baramati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.