Baramati Lok Sabha Election: Kanchan Kul has expressed his confidence of victory after voting | बारामती लोकसभा निवडणूक : मतदानानंतर कांचन कुल यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
बारामती लोकसभा निवडणूक : मतदानानंतर कांचन कुल यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

केडगाव : राहु (ता दौंड) येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन राहुल कुल येथे सकाळी ७ वाजता मतदान केले. यावेळी कांचन कुल यांचे पती व दौंडचे आमदार राहुल कुल,चिरंजीव आदित्य, कन्या मायरा कुल यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मतदानाला जाण्यापूर्वी कुल परिवाराने ग्रामदैवत शंभु महादेव याचे दर्शन घेतले. यावेळी कांंचन कुल म्हणाल्या की,कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर यावर्षी बारामतीमध्ये इतिहास घडणार आहे.संपूर्ण देशाचे लक्ष लागुन राहीलेल्या या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे.निवडणुक जनतेने हातामध्ये घेतली आहे. मतदानानंतर कांचन कुल यांचे पती राहुल कुल बारामती मतदारसंघातील भोर व खडकवासला,सासु दौंड येथे, स्वत: कांचन कुल बारामती व पुरंदर तसेच पक्ष प्रतिनिधी गणेश बीडकर हे इंदापुर तालुक्यातील ठिकठिकाणी मतदान केंद्रावर गाठीभेटी घेणार असल्याचे कांचन कुल यांनी सांगितले. 
 


Web Title: Baramati Lok Sabha Election: Kanchan Kul has expressed his confidence of victory after voting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.