पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत

By नितीन चौधरी | Updated: April 18, 2024 12:48 IST2024-04-18T12:45:15+5:302024-04-18T12:48:30+5:30

पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून धंगेकर यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे....

Application filed by Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi from Pune, fighting with Muralidhar Mohol | पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत

पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत

पुणे :पुणे मावळ व शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला.  त्यामुळे पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करून धंगेकर यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीतील  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार व बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, अशोक पवार, संजय जगताप, सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. दंगेकर यांनी आपला अर्ज पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सुपूर्द केला. धंगेकर यांची लढत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या सोबत होणार आहे.

Web Title: Application filed by Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi from Pune, fighting with Muralidhar Mohol