घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 15:30 IST2023-04-25T15:30:13+5:302023-04-25T15:30:48+5:30
तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता

घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
महूडे : शिंद (ता. भोर) येथील पदवीधर तरुण निशिकांत संभाजी मोहिते (वय २५) सोमवारी (दि. २४) गावाजवळच्या घागुरजाई नांद येथील शिवारातील नीरा नदीच्या पात्रात त्याच्या साथीदारांबरोबर पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
निशिकांत ( लल्लू ) हा शिंद येथील दुपारी बारा ते एक च्या दरम्यान निरा नदीच्या पात्रात दोन मित्र सोबत पोहत होता. घरी जाण्यासाठी गडबड करीत बाहेर येत असताना त्याचा दमछाक झाल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या साथीदारांनी आरडाओरड केल्याने शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने निशिकांत यास पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याचे नातेवाईक आणि गावातील तरुणांनी निशिकांत यास उपचारासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच निशिकांत मोहिते यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत शिंदे हे करत आहेत. निशिकांत मोहिते हा शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता.