Union Budget 2026: केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:55 IST2026-02-02T11:54:37+5:302026-02-02T11:55:41+5:30

वर्ष २०२६-२७ साठीच्या या अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष घोषणा केली जाण्याची अपेक्षा होती

2 railway corridors for Pune and Rs 517 crore for Pune Metro in the central budget | Union Budget 2026: केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी

Union Budget 2026: केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी

पुणे : केंद्र सरकारच्या २०२६-२०२७च्या अंदाजपत्रकात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित केल्याचे जाहीर केेले आहे. त्यात मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद या दोन रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे. पण हे दोन रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी वगळता या अर्थसंकल्पात पुण्यासाठी ठोस असे काही मिळाले नाही. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी रविवारी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष घोषणा केली जाण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अर्थमंत्र्यांच्या पूर्ण अर्थसंकल्पीय भाषण तब्बल ९५ मिनिटे म्हणजेच १ तास २५ मिनिटांचे होते. या भाषणात ७ हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणाही त्यांनी केली. त्यावेळी या कॉरिडॉरची नावे घेताना सीतारामन यांनी दोन वेळा पुण्याचा उल्लेख केला. पर्यावरणदृष्ट्या शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरांना जोडणारे सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित केले जातील हे कॉरिडॉर महानगरांना एकमेकांशी जोडून देशाची वाटचाल विकासाकडे अधिक वेगाने होण्यास मदत करतील. त्यात मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळ्रुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळरू, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी या सात रेल्वे कॉरिडॉरचा समावेश आहे. हे दोन रेल्वेचे कॉरिडॅार तयार केेले जाणार आहेत. हे दोन रेल्वेचे कॉरिडाॅर आणि पुणे मेट्रोसाठी ५१९ कोटी वगळता पुणे शहराला ठोस असे काही मिळाले नाही. 

Web Title : केंद्रीय बजट 2026: पुणे को रेलवे कॉरिडोर, मेट्रो के लिए ₹517 करोड़।

Web Summary : केंद्रीय बजट 2026 में पुणे को दो हाई-स्पीड रेल कॉरिडोर (मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद) और पुणे मेट्रो के लिए ₹517 करोड़ आवंटित किए गए। वित्त मंत्री निर्मला सीतारमण द्वारा पेश बजट में इसके अलावा पुणे को कोई बड़ी आवंटन नहीं मिला।

Web Title : Union Budget 2026: Pune gets railway corridors, ₹517 crore for metro.

Web Summary : The Union Budget 2026 allocates two high-speed rail corridors (Mumbai-Pune, Pune-Hyderabad) and ₹517 crore for Pune Metro. Aside from these, Pune received no other major allocations in the budget presented by Finance Minister Nirmala Sitharaman.