Mumbai North Lok Sabha Constituency : ऊर्मिलाच्या रॅलीदरम्यान पुन्हा ‘मोदी...मोदी...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 06:09 IST2019-04-17T06:09:30+5:302019-04-17T06:09:57+5:30

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.

'Modi ... Modi ...' during Urmila rally | Mumbai North Lok Sabha Constituency : ऊर्मिलाच्या रॅलीदरम्यान पुन्हा ‘मोदी...मोदी...’

Mumbai North Lok Sabha Constituency : ऊर्मिलाच्या रॅलीदरम्यान पुन्हा ‘मोदी...मोदी...’

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी बोरीवली पश्चिमेकडे काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीदरम्यान काही तरुणांनी मोदी यांच्या नावाच्या घोषणा देत घातलेला गोंधळ मिटतो ना मिटतो तोच मंगळवारी ऊर्मिला यांच्या प्रचारार्थ मालाड येथे काढण्यात आलेल्या रॅलीलगतही उपस्थितांनी ‘मोदी...मोदी’ अशा घोषणा दिल्या. मात्र, ऊर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रमुख
लढत आहे. दिवसेंदिवस ही लढत चुरशीची होत आहे. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण वाढले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मंगळवारी मालाड
मार्केट येथे ऊर्मिला यांची रॅली दाखल झाली असता, रॅलीलगत
भाजप समर्थकांनी ‘मोदी...मोदी...’ अशा घोषणा देत उपस्थितांचे
लक्ष वेधून घेतले. महत्त्वाचे म्हणजे
या घोषणाबाजीकडे ऊर्मिला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुरतेच दुर्लक्ष करत भाजपची खिल्ली उडवली गेल्याचे बोलले जात आहे.

Web Title: 'Modi ... Modi ...' during Urmila rally