मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 07:06 IST2019-04-21T05:19:45+5:302019-04-21T07:06:34+5:30
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला.

मोदी हेदेखील दहशतवादी संघटनेचे सदस्यच - आंबेडकर
कोल्हापूर: करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला.
ज्या साध्वीला भाजपने उमेदवारी दिली त्या साध्वीच्या शापामागील गोळी कुणी झाडली असा सवाल उपस्थित करून आंबेडकर म्हणाले, रोज पंतप्रधान शहिदांचे गुणगान गातात. मग शहिदांचा अपमान करणाºया साध्वीबाबत ते गप्प का? सध्या निवडणुकीसाठी करोडो रुपयांचा चुराडा सुरू असताना गरीब माणूस या निवडणुकीत जिंकून येऊ शकतो हे दाखवून देण्यासाठी वंचित आघाडीने उमेदवार उभे केले आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.