'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:11 PM2019-04-15T19:11:53+5:302019-04-15T19:16:00+5:30

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल लढत

lok sabha election will have to write a book if we wins baramati says bjp leader chandrakant patil | 'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल'

'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल'

Next

जळगाव- सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. माध्यमांवर जे सुरू आहे त्यावरून आपल्याला अंदाज येत असेलच. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे. बारामतीची जागा जर पाडली, तर आपण काय काय केलं यासंदर्भात पुस्तक लिहावं लागेल, असं सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.

पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जळगाव व भडगाव येथे बैठका घेतल्या. त्यात ते बोलत होते. माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ. पण त्यामुळे झोपून राहू नका. आपल्याला यंदा ३७३ जागांचे टार्गेट आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर  भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपानं बारामतीची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये भाजपानं कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंचं आव्हान आहे.
 

Web Title: lok sabha election will have to write a book if we wins baramati says bjp leader chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.