Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

By विश्वास मोरे | Published: May 2, 2024 06:42 PM2024-05-02T18:42:44+5:302024-05-02T18:43:36+5:30

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे वतीने जनजागृती केली जात आहे...

Vasudev kartahe polling jagar; Activities of Pimpri-Chinchwad by Natya Parishad | Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

Pimpri Chinchwad: वासुदेव करताहेत मतदानाचा जागर; नाट्य परिषदतर्फे पिंपरी-चिंचवडचा उपक्रम

पिंपरी : एकजुटीनं, दुरदृष्टीनं, चला गाजवू मैदान, राष्ट्रहितासाठी करायचं मतदान..., लोकशाहीचा करायचा सन्मान..., १०० टक्के हो करायचं मतदान, लोकशाहीचा करायचा सन्मान...’, हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी घुमत आहे.

निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे वतीने जनजागृती केली जात आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले, मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे, यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दररोज त्यांच्या मार्गांचे नियोजन आदी बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग, आसाराम कसबे, संतोष रासने करीत आहेत.

गीतांच्या माध्यमातून जागृती

अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, “मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत. त्यांच्या मार्फत लोक गीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे, मतदान करून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन वासुदेव करत आहेत. शहरातील उद्याने, सोसायट्या आणि विविध भागात सकाळी ६ ते १० या वेळेत ही जनजागृती करण्यात येत आहे.”

Web Title: Vasudev kartahe polling jagar; Activities of Pimpri-Chinchwad by Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.