PCMC Election Result 2026: ‘नोटा’ने कोणाला तारले, तर कोणाला मारले! पिंपरीत २.९५ टक्के मतदान, २९ हजार लोकांना 'कोणीही नको'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:54 IST2026-01-23T11:53:44+5:302026-01-23T11:54:18+5:30
PCMC Election Result 2026 २०१७ मधील निवडणुकीत बारा उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले होते, २०२६ मध्येही बारा उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत.

PCMC Election Result 2026: ‘नोटा’ने कोणाला तारले, तर कोणाला मारले! पिंपरीत २.९५ टक्के मतदान, २९ हजार लोकांना 'कोणीही नको'
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी एकूण ९ लाख ८९ हजार २६ मतदान झाले. त्यापैकी २९,२२९ मतदान ‘वरीलपैकी कोणीही नाही’ अर्थात ‘नन ऑफ द अबोव्ह’ (नोटा)साठी झाले. ते एकूण मतदानाच्या तुलनेत २.९५ टक्के आहे. ही आकडेवारी एकूण मतदानाच्या दृष्टीने नगण्य आहे; परंतु बारा प्रभागांतील उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. प्रभाग २९ मध्ये ५.८८ टक्के सर्वाधिक मतदान झाले आहे, तर प्रभाग २ मध्ये सर्वांत कमी म्हणजे १.४७ टक्के मतदान ‘नोटा’ला झाले.
प्रभाग == उमेदवाराचे नाव == मिळालेले मताधिक्य == नोटाची मते
५ == भीमाबाई फुगे == ७३४ == ७५२
८ == सुहास कांबळे == २५६ == ६९९
१९ == सविता आसवानी == २१ == १४२५
१९ == मंदार देशपांडे == ३१४ == ६३९
२२ == कोमल काळे == ६७३ == ९३३
२३ == योगिता बारणे == ४३९ == ७७१
२७ == सागर कोकणे == ६०० == १४०६
३० == राजू बनसोडे == ७११ == ७४२
प्रतीक्षा लांघी-जवळकर == ५३४ == १२२९
३१ ज्ञानेश्वर जगताप == ५२३ == १०३६
दीप्ती जगताप == ७४५ == १५२८
३२ == प्रशांत शितोळे == २९० == ४५२
‘नोटा’चे मतदान : टॉप टेन प्रभाग
प्रभाग २९ : ५.८८
प्रभाग १८ : ४.६९
प्रभाग ३१ : ४.६२
प्रभाग २५ : ४.३५
प्रभाग १८ : ४.०६
प्रभाग ४ : ३.९८
प्रभाग २७ : ३.७२
प्रभाग २६ : ३.६३
प्रभाग ३२ : ३.४८
प्रभाग १५ : ३.२७
दोन जागांवर नोटासाठी एकही नाही मत
प्रभाग ६ (ब) आणि प्रभाग १० (ब) मध्ये ‘नोटा’साठी एकही मतदान झाले नाही. प्रभाग ६ मध्ये धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, रोशल गार्डन या परिसराचा समावेश आहे. प्रभाग दहामध्ये मोरवाडी, लालटोपीनगर, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृदांवन सोसायटी, संभाजीनगर या भागांचा समावेश आहे.
असाही योगायोग
२०१७ मधील निवडणुकीत बारा उमेदवार ‘नोटा’पेक्षा कमी मताधिक्याने विजयी झाले होते. २०२६ मध्येही बारा उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत प्रभाग ३० मधील दोन उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते पडली होती. याही निवडणुकीत याच प्रभागातील उमेदवारांना कमी मते पडली आहेत. प्रभाग ३० मध्ये दापोडी, सिद्धार्थनगर, गणेशनगर, एसटी वर्क शॉप या भागांचा समावेश आहे.