मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:38 PM2019-04-12T17:38:42+5:302019-04-12T17:39:41+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते.

21 candidates in Maval lok sabha election | मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार 

मावळमधून लोकसभेच्या रिंगणात २१ उमेदवार; सात जणांची माघार 

googlenewsNext
ठळक मुद्देमावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार आहेत. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या मुदतीत शुक्रवारी सात जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 
मावळ लोकसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीमध्ये चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज त्रुटी असल्याने बाद झाले होते. तर, २८ उमेदवार पात्र ठरले होते. अर्ज माघारी घेण्याची आज  अंतिम मुदत होती. आज सात उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात २१ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार आणि शिवसेना-भाजप महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात खरी लढत होणार आहे.  

'यांनी' घेतली माघार! 
बळीराजा पाटीर्चे गुणाट संभाजी नामदेव, हिंन्दुस्थान जनता पाटीर्चे भीमराव आण्णा कडाळे, अपक्ष जाफर खुर्शिद चौधरी, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, नुरजहॉ यासिन शेख, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, प्रकाश नैनूमल लखवाणी या सात उमेदवारांनी आज निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. 
२१ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात! 
राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीचे पार्थ पवार, शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे, बहुजन समाज पाटीर्चे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे जगदीश शामराव सोनवणे, आंबेडकर राईट्?स पार्टी आॅफ इंडियाच्या जया संजय पाटील, बहुजन मुक्ती पाटीर्चे पंढरीनाथ नामदेव पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक,  भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील, वंंचित बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील, बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पाटीर्चे सुनील बबन गायकवाड त्याचबरोबर अपक्ष अजय हनुमंत  लोंढे, अमृता अभिजीत आपटे,  नवनाथ विश्वनाथ दुधाळ,  प्रशांत गणपत देशमुख, बाळकृष्ण धनाजी घरत,  राकेश प्रभाकर चव्हाण, राजेंद्र मारुती काटे, विजय हनुंमत रंदिल, सूरज अशोकराव खंडारे, सुरेश श्रीपती तौर, डॉ. सोमनाथ अर्जुन पौळ हे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: 21 candidates in Maval lok sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.