'या' लोकप्रिय टिव्ही सेलिब्रिटींचे शिक्षण ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 04:59 PM2020-03-27T16:59:27+5:302020-03-27T17:11:04+5:30

करण सिंग ग्रोव्हर करणने आपले हॉटेल मॅनेजमेंटचे ग्रॅजूएशन मुंबईतील एका नामंकित इन्स्टिट्यूटमधून केले आहे.

हिना खान या टीव्ही अभिनेत्रीने बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर्स केले आहे.

दिव्यंका त्रिपाठी टीव्हीची या लोकप्रिय अभिनेत्रीला जेव्हा अभिनय करण्याची ऑफर आली तेव्हा दिव्यंका सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांची तयारी करत होती.

व्हिव्हियन दिसेना या टीव्ही अभिनेत्याने इंजिनिअरिंग केली आहे.

रोनित रॉय या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे.

करण पटेल "ये है मोहब्बतें" फेम अभिनेता करण पटेल याने आपले पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून केले आहे.

मौनी रॉय या लोकप्रिय नागिण गर्लने दिल्लीतील मिरांडा हाउसमधून इंग्रजी लिट्रेचरमध्ये आपले ग्रॅज्युएशन केले आहे आणि त्यानंतर मलिया इस्लामिया इंस्टिटूटमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.

शरद केळकर शरदने ग्वाल्हेरच्या प्रेस्टिज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्चमधून मार्केटींगमध्ये एमबीए केलं आहे.

राम कपूर राम यांनी आपले ग्रॅज्युएशन भारतात केले आणि त्यानंतर ते अ‍ॅक्टिंगमध्ये मास्टर्स पूर्ण करण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये गेले.

प्रितीका राव प्रितीकाने मुंबई युनिव्हरसिटीतून आपले ग्रॅज्युएशन केले आहे. तसेच तिने अॅडवरटइसिंग आणि जर्नलिसमचा डिप्लोमा केला आहे.

दीपिका सिंग "दिया और बाती हम" या मालिकेतील या अभिनेत्रीने पंजाब टेक्निकल युनिव्हरसिटीमधून स्पेशलायझेशन म्हणून मार्केटिंगसह बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आपले पोस्ट ग्रॅजूएशन केले आहे.

अनस रशीद या अभिनेत्याने सायकोलॉजीमध्ये मास्टरची डिग्री मिळवली.आणि त्यासोबतच तो उर्दू, हिंदी, पर्शियन आणि अरबी भाषा लिहू आणि वाचूही शकतो.

रागिनी खन्ना रागिनीने आर. एन .शाह या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने मुंबई युनिव्हरसिटीतून मास्टर डिग्री मिळवली.