ब्युटीफुल्ल... स्वीटूची ऑनस्क्रीन आई झाकच,नलू मावशीचा मॉडर्न लूकही बसाल पाहतच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 08:00 AM2021-07-25T08:00:00+5:302021-07-25T08:00:00+5:30

छोट्या पडद्यावरच्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका प्रचंड गाजत आहे.मालिकेतल्या सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना रसिकांची पसंती मिळत आहे. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो नलू मावशी म्हणजे दिप्ती केतकरचा. नलू मावशी या भूमिकेला रसिकांची विशेष पंसती मिळत आहे.

ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी नलू मावशी म्हणजेच दिप्ती हे नाव काही नवीन नाही.

अभिनेत्री दिप्ती केतकरने साकारलेली नलिनी म्हणजेच नलूच्या मावशी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.

दिप्ती साडीमध्ये सुंदर दिसतेच पण खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस देखील आहे.

सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील काही फोटोज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या आऊटफिटमध्ये दिप्तीचं सौंदर्य खुलून आलं आहे.

चाहत्यांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

मालिकेतील तिच्या साध्या सरळ लुकप्रमाणेच तिच्या मॉडर्न लूकवर देखील चाहते पूर्णपणे फिदा झाले आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!