मराठमोळ्या साजश्रृंगारात वहिनीसाहेबांनी दिल्या अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा, पहा फोटो

Published: May 14, 2021 03:01 PM2021-05-14T15:01:51+5:302021-05-14T15:11:31+5:30

मराठी टेलिव्हिजवरील वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या चाहत्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी टेलिव्हिजवरील वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने आपल्या चाहत्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तीरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे.

काही महिन्यांपूर्वी धनश्रीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

धनश्री काडगावकर सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे आणि या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोशल मीडियावर ती फोटो शेअर करत असते.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.

धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली.

विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!