अनिता हसनंदानी तडकाफडकी इंडस्ट्रीला ठोकला रामराम, काय आहे यामगचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:45 PM2021-06-12T15:45:52+5:302021-06-12T15:54:53+5:30

अनिता हंसनंदानी सध्या तिचे मातृत्वाचा आनंद घेत आहे. अनिताने ९ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला आहे. बाळासह अनेक फोटो अनिता चाहत्यांसह शेअर करत असते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास अनिताचा मुलासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतानाचे फोटो पाहायला मिळतील.

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात.

2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते.

लग्नाच्या सात वर्षानंतर अनिताने बाळाला जन्म दिला.

अनिता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

अनिताने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचे तिने जाहीर केले आहे.

अचानक इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत.

आई झाल्यानंतर इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

सूंपर्ण वेळ बाळाला देता यावा म्हणून निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!