Indian Idolचा किताब पटकावल्यानंतर कुठे गायब झाले हे दमदार विजेते?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 02:40 PM2021-06-10T14:40:35+5:302021-06-10T14:45:20+5:30

इंडियन आयडॉलने गेल्या कित्येक वर्षात अनेक दमदार गायक सिनेइंडस्ट्रीला दिले. मात्र ज्या गायकांनी इंडियन आयडॉलचा किताब पटकावले ते सध्या इंडस्ट्रीतून गायब आहेत.

टेलिव्हिजनवरील सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल खूप लोकप्रिय आहे. गेल्या कित्येक वर्षात या शोने अनेक दमदार गायक सिनेइंडस्ट्रीला दिले. मात्र ज्या गायकांनी इंडियन आयडॉलचा किताब पटकावले ते सध्या इंडस्ट्रीतून गायब आहेत.

सीझन १ः अभिजीत सावंतने पहिल्या सीझनमध्ये ट्रॉफी पटकावली. मात्र सध्या तो गायब आहे. पहिल्या पर्वात अभिजीतने अकरा स्पर्धकांना हरवून विजेता बनला होता. त्यानंतर त्याने एकापेक्षा एक दमदार गाणी गाऊन सर्वांचे मन जिंकले. मात्र सध्या तो चर्चेत नसतो.

सीझन २ः इंडियन आयडॉलचा दुसरा सीझनचा किताब संदीप आचार्यने जिंकला आहे. या सीझनमध्ये नेहा कक्करदेखील सहभागी झाली होती. मात्र तिसऱ्या राउंडमध्ये ती बाहेर पडली होती आणि आता ती या शोचे परीक्षण करत आहे. संदीप आता हयात नाही. त्याचे १५ डिसेंबर, २०१३ मध्ये निधन झाले.

सीझन ३ः प्रशांत तमांग तिसऱ्या सीझनचा विजेता आहे. २००७ साली त्याने इंडियन आयडॉलच्या या सीझनची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर तो खूप लोकप्रिय झाला होता. आता तो कुठे आहे आणि काय करतो, याबद्दल काहीच माहिती नाही.

सीझन ४ः इंडियन आयडॉलच्या चौथा सीझनची विजेती सौरभी देबबर्मा ठरली होती. पहिल्यांदाच एका मुलीने हा किताब पटकावला होता. या सीझनमध्ये कैलाश खेर, सोनाली बेंद्रे, जावेद अख्तर आणि अनू मलिक परीक्षक होते. या सीझनमध्ये सौरभीने सौरभ थापाला हरविले होते आणि त्यानंतर तिने त्याच्याशीच लग्न केले होते.

सीझन ५ः श्रीराम चंद्र इंडियन आयडॉलच्या पाचव्या सीझनचा विजेता होता. या शोचा विजेता झाल्यानंतर ये जवानी है दीवानी आणि मेरे ब्रदर की दुल्हन या सिनेमासाठी गाणी त्याने गायली. याशिवाय त्याने ७ भाषेमधील गाणी गायली आहेत.

सीझन ६ः इंडियन आयडॉल ६चा किताब विपुल मेहताने पटकावला आहे. हा सीझनची ट्रॉफी मिळवल्यानंतर लगेच त्याचे पहिले सिंगल वंदे मातरम रिलीज झाले. आता तो सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे पण बऱ्याच ठिकाणी शोज करतो.

सीझन ७ः अंजना पद्मनाभनने २०१३ साली इंडियन आयडॉलच्या सातव्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे. त्यावेळी लहान मुलांना टॅलेंट आजमवण्याची संधी दिली होती. पहिल्यांदा इंडियन आयडॉल ज्युनिएर बनली होती अंजना. ती विजेती झाल्यानंतर तिला २५ लाख रुपये, एक कार, पाच लाख रुपयांची एफडी आणि एका स्पॉन्सरकडून दोन लाख रुपये मिळाले होते.

सीझन ८ः अनन्या श्रीतम नंदाने इंडियन आयडॉलच्या आठवा सीझनचा किताब पटकावला. या सीझनमध्ये आठ मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात १३ वर्षीय अनन्याने हा किताब पटकावला. या सीझनचे परीक्षण सलीम मर्चेंट, विशाल दादलानी आणि सोनाक्षी सिन्हा करत होते.

सीझन ९ः एल वी रेवंत इंडियन आयडॉलच्या नवव्या सीझनची विजेती ठरली होती. त्यानंतर तिने बाहुबली चित्रपटातील मनोहारी हे गायले आणि याशिवाय तिने अर्जुन रेड्डी चित्रपटातही गाणे गायले आहे.

सीझन १०ः सलमान अली दहाव्या सीझनचा विजेता ठरला. हा शो जिंकल्यानंतर त्याला बक्षीस म्हणून २५ लाख रुपये आणि एक कार मिळाली होती. लहानपणापासून सलमान आपल्या वडिलांसोबत जागरण आणि लग्नाला जात होता. तिथूनच त्याच्यात गायनाची आवड निर्माण झाली.

सीझन ११ः सनी हिंदुस्तानीचे बालपण खूप हलाखीत गेले आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तो खूप लहान होता. पंजाबमधील बठिंडा येथील सनीला बालपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यामुळे छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये सिंगिंग करत होता. शो जिंकल्यानंतर त्याचे नशीबच बदलून गेले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!