BIGG BOSSच्या घरातच झाले होते या अभिनेत्रीचे लग्न, आता जगतेय आलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:56 PM2020-08-06T13:56:16+5:302020-08-06T14:10:43+5:30

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मॉडेलिंगद्वारे इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. अशी एक अभिनेत्री आहे ज्याने आपल्या सौंदर्याने अनेकदा लोकांच्या मनाला भुरळ घातली आहे. ती अभिनेत्री म्हणजे सारा खान.

6 ऑगस्ट 1989 रोजी भोपाळमध्ये जन्मलेल्या सारा खानने टीव्ही जगतात आपले स्थान निर्माण केले.

'सपना बाबुल का .. बिदाई' या मालिकेत साराने साधनाची भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली होती.

२०१० मध्ये झी टीव्हीवरील मालिका 'प्रीत से बांधी ये दोरी राम मिलायी जोडी' या मालिकेत साराच्या व्यक्तिरेखेला रसिकांनीही पसंती दिली.

ती फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. नित्यनिमयाने योगा वर्कआऊट करत फिट राहते.

२०१० मध्ये ती बिग बॉस 4 मध्ये स्पर्धक होती आणि बिग बॉसच्या सेटवर साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी इस्लामिक परंपरेनुसार विवाह केला होता.

पण दोन महिन्यांनंतर २०११ मध्ये या दोघांचा घटस्फोटही झाला होता.

हे लग्न करण्यासाठी त्यांना लाखो रूपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र काही कारणामुळे चॅनलने पैसे देण्याचे नाकारले आणि दोघांनीही शेवटी रितसर घटस्फोट घेत वेगळे झाले.

त्यानंतर या अभिनेत्रीने कित्येक म्युझिक अल्बम आणि चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.