'तुला पाहते रे'मधील मायरा रियल लाईफमध्ये आहे तितकीच ग्लॅमरस, फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:06 PM2019-06-19T13:06:32+5:302019-06-19T13:08:21+5:30

'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील मायराची भूमिका साकारणारी अभिज्ञा भावे सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतेय.

भूमिका कुठलीही असो आपल्या खास अशा टचने अभिज्ञा प्रत्येक भूमिका आपलीशी करते हे तिचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे.

'देवयानी', 'लगोरी', 'खुलता कळी खुलेना', 'कट्टी-बट्टी' या मालिकांमध्ये अभिज्ञाने आपल्या भूमिकेतून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.

यावर्षी प्रदर्शित झालेल्या सूर सपाटा चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

तुला पाहते रे मालिकेत मायरा ही ग्लॅमरस असून अभिज्ञादेखील खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे.

अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नुकताच त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.

अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून तिने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस व एथनिक आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत.