'तुझ्यात जीव रंगला'मधील पाठक बाईंची बहिणदेखील आहे त्यांच्यासारखी सुंदर, पहा त्यांचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:00 AM2019-06-29T06:00:00+5:302019-06-29T06:00:00+5:30

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधर हिने साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.

अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून अपडेट देत असते.

तसंच तिने सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटोदेखील शेअर केलेत.

नुकतेच तिने तिच्या बहिणीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिची बहिणदेखील तिच्यासारखी सुंदर आहे.

अक्षयाच्या बहिणीचं नाव अनुजा देवधर आहे. अक्षया व अनुजा काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्ट्या व्यतित करण्यासाठी गेले होते. तिथले देखील फॅमिली व फ्रेंण्ड्ससोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणादाने नुकतीच एक्झिट घेतली असून राणादा सारखा दिसणारा राजाने एन्ट्री घेतली आहे.