अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 09:33 AM2020-09-12T09:33:54+5:302020-09-12T09:47:44+5:30

'रात्रीस खेळ चाले २' मालिका अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांना प्रेमाचा वर्षाव केला.

पण रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी होती.जिची चर्चा सर्वत्र झाली ती म्हणजे शेवंता.

शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच ग्लॅमरस अंदाज यामुळे 'रात्रीस खेळ चाले २' मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.

या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली.

मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांची भरघोस पसंती मिळाली.

तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. अपूर्वा सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकताच तिने तिचा ग्लॅमरस आणि तितकाच हटके लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोत तिचा एरव्ही कधीही न पाहिलाला अंदाज पाहायला मिळत आहे. पांढरा रंगाचा शॉर्ट फ्रॉकमध्ये ती दिसत आहे.

हा फोटो शेअर करताच लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे. हा फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. उत्तम ड्रेसिंग करणेही एक कला असल्याचे तिने कॅप्शन दिली आहे.

ज्याप्रमाणे तिची प्रत्येक अदा रसिकांना भावली... तशी तिची मॉडर्न अदाही रसिकांच्या मनात घर करुन राहिलीय..