‘तारक मेहता’मधील बागाची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटो पाहून बबितालाही विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:22 PM2021-10-16T19:22:05+5:302021-10-16T19:32:22+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बागा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. यात बागाची गर्लफ्रेंड बावरीदेखील प्रेक्षकांना खूप भावली होती.

बावरीची भूमिका मोनिका भदोरिया हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

मोनिका खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटोंना पसंती मिळताना दिसते.

मोनिका भदोरिया या मालिकेत जवळपास ६ वर्ष काम केले. मग तिने वैयक्तिक कारण देत मालिका सोडली.

मोनिका भदोरिया फिटनेसच्या बाबतीच खूप जागरूक आहे.