तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताचा हा लूक पाहून व्हाल क्लीन बोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 06:45 PM2021-01-22T18:45:45+5:302021-01-22T18:45:45+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. (फोटो: इंस्टाग्राम)

या मालिकेतील बबिताची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)

अतिशय स्टाईलिश असलेल्या या बबिताच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

या मालिकेत बबिताची भूमिका मुनमुन दत्ता ही अभिनेत्री साकारत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुनला अभिनयासोबतच फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती चित्रीकरणातून वेळ मिळाल्यास नेहमीच कुठे ना कुठे फिरायला जात असते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मुनमुनने तारक मेहता का उल्टा चष्माच्याआधी काही चित्रपट, मालिकांमध्ये छोट्या, मोठ्या भूमिका साकारल्या असल्या तरी तिला खऱ्या अर्थाने ओळख ही याच मालिकेने मिळवून दिली. (फोटो: इंस्टाग्राम)