'स्वराज्य रक्षक संभाजी'मधील येसूबाई उर्फ प्राजक्ता गायकवाडचे हे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:00 AM2020-04-09T06:00:00+5:302020-04-09T06:00:02+5:30

लॉकडाऊनमुळे सध्या कोणत्याच मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडत्या जुन्या मालिका त्यांना पुन्हा पाहायला मिळत आहेत.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या.

या मालिकेत येसुबाई यांच्या भूमिकेत आपल्याला प्राजक्ता गायकवाडला पाहायला मिळाले होते. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

प्राजक्ताला शालेय जीवनापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे ती शालेय एकांकिका, नाटक स्पर्धांमध्ये नेहमीच भाग घ्यायची

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिच्या फेसबुकवर ती नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. हे सगळे फोटो आपल्याला तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर पहायला मिळतात.

प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली डान्सर आहे. तिने डान्सच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे.

प्राजक्ता या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसत असली तरी तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील प्रचंड आवडतात.

प्राजक्ताने या मालिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली असून घोडेस्वारीचे आणि तलवारबाजीचे शिक्षण देखील घेतले आहे.

प्राजक्ता खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते असे तिच्या चाहत्यांंचे म्हणणे आहे.