कडक! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ‘स्प्लिट्सविला गर्ल’ची एन्ट्री, कोण आहे ही बोल्ड बाला?

Published: May 18, 2021 12:44 PM2021-05-18T12:44:33+5:302021-05-18T12:53:25+5:30

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. होय, ती सुद्धा एका हॉट बालेची.

गेल्या 12 वर्षांपासून पे्रक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. होय, ती सुद्धा एका हॉट बालेची.

ही हॉट बाला कोण तर आराधना शर्मा. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आराधना सध्या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसत आहे.

ही आराधना कोण तर ‘स्प्लिट्सविला 12’ची स्पर्धक. ‘स्प्लिट्सविला 12’मध्ये आराधना तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली होती.

आराधना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर ती रोज नवे बोल्ड फोटो शेअर करत असते.

आराधना अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील.

शिवाय ती एक मॉडेलही आहे. आत्तापर्यंत अनेक फॅशन शोमध्ये ती रॅम्पवर चालताना दिसली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सध्या औषधांच्या काळाबाजार आणि त्याचा पर्दाफाश असे कथानक दाखवले जातेय.

या ट्रॅकमध्ये आराधनाची शोमध्ये एन्ट्री झाली आहे.

साहजिकच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये एन्ट्री होताच आराधना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!